लांडेवाडीत कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन
मंचर – ग्रामीण विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. नेहमी प्रयत्नशील राहून कामात स्वत:ला झोकून दिले पाहिजे. आधुनिक युगातील गरजा लक्षात घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आढळराव पाटील व्यवस्थापन आणि संशोधन महविद्यालय (लांडेवाडी, ता.आंबेगाव) येथे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेच्या व्यवस्थापिका प्रा. शामल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डायनालॉग इंडिया लिमिटेडचे नितीन मच्चर यांनी विद्यार्थ्यांना कंपनीबद्दल माहिती दिली.
कंपनीने संस्थेत येऊन घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये 14 विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पदावर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी समन्व्यक प्रा.सोनाली वळसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कॅम्पस ड्राईव्हसाठी कंपनीचे सेल्स जनरल मॅनेजर नितीन मच्चर, बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रीतम चौधरी, असिस्टंट मॅनेजर स्वीटी आंबेकर, सेल्स इजिनिअर अरविंद शर्मा, सेल्स सिनिअर एक्झिक्युटिव्ह ज्योती जेडगुले उपस्थित होते.
या कॅम्पससाठी कंपनीचे अधिकारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ. विनोद सायंकर, भीमाशंकर बी. ऍड. महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. संजय चौधरी व प्राध्यापक उपस्थित होते. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. शामल चौधरी, संचालक डॉ. विनोद सायंकर व प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.