वडापुरी – क्रिकेटच्या मैदानात शतक पूर्ण झाल्यावर किंवा एखादी महत्त्वपूर्ण विकेट काढल्यावर एखादा क्रिकेटर या आनंदात जे काही करतो तेच इंदापूर तालुक्यातील शहा येथे पाहायला मिळाले.
शहा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार केसरी’ भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यतीसाठी खास धावणारे खिल्लार, म्हैसूर गावरान, निळा कोसा, कर्नाटकी खिल्लार, गावरान खिल्लार या प्रजातींचे बैल या शर्यतीत सहभागी झाले.
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, जळगाव यांसह राज्यातील विविध भागांतून बैलगाडा मालक सहभागी झाले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आयोजकांचे कौतुक केले. उपस्थित राहून बैलगाडा शर्यत पहाण्याचा आनंद घेतला.