नवी दिल्ली – आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. सध्या आयपीएलच्या या फायनलवर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, कालही पावसाची शक्यता नव्हती, पण सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडला. त्यामुळे हा सामना आज होणार आहे. मात्र आजही पाऊस आला तर काय होणार असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना सध्या पडला आहे.
आज अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजही पावसाची शक्यता नव्हती, पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी १० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजचे हवामान पाहता उद्याही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोमवारी पाऊस झाल्यास GT चॅम्पियन होऊ शकते
रिझर्व्ह डे च्या दिवशी देखील पाऊस आला तर काय हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात असेल. अशात सोमवारी पाच षटकांचा देखील सामना होऊ शकला नाही, तर गुजरात टायटन्सला या आयपीएल हंगामाचा विजेता घोषित केले जाईल. कारण पॉईंटची आकडेवारी पाहत गुजरातने चेन्नईला मागे टाकलेले आहे. त्यामुळे गुजरातला विजयी केलं जाऊ शकत असा अंदाज अनेकांनी सोशल मीडियावर वर्तवायला सुरुवात केली आहे.
आकाश चोप्राची भविष्यवाणी
तथापि, माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने असा दावा केला आहे की जर राखीव दिवशी देखील पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर,2023 चे विजेते निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर घेतली जाऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.