नवी दिल्ली – ChatGPT हा जगातील सर्वात कमी वेळेमध्ये लोकप्रिय होणारा प्लॅटफॉर्म ठरला आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या या किमयेमुळे मानवाचे बरेचसे प्रश्न सुटले आहेत. परंतु तुम्हाला जर ChatGPT वापरून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगल कंपनीचे ‘गूगल बार्ड’ हे फीचर आता भारतात वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
गूगलने आपल्या Google I/O 2023 इव्हेंटमध्ये नवीन वैशिष्ट्यांसह हे बार्ड सादर केले आहे. हे गुगल बार्ड 20 पेक्षा जास्त कोडिंग भाषांसह येते. तसेच सर्च जायंट गुगलने आता चॅटजीपीटीला प्रतिस्पर्धी म्हणून हे चॅटबॉट बार्ड 180 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. गुगल बार्ड हे 40 हून अधिक भाषांमध्ये असणार आहे. तसेच इंग्रजी व्यतिरिक्त जपानी आणि कोरियन भाषेचा देखील समावेश असणार आहे.
दरम्यान, याआधी चॅटबॉट केवळ मजकूरासाठी लॉन्च करण्यात आला होता, परंतु आता गुगलने त्याला चांगला प्रतिसाद दिला असून वापरकर्ते त्यांच्या उत्तरांमध्ये थेट गूगल्सचे फोटो पाहू शकणार आहे.