खडकवासला – हवेली तालुक्यातील कुडजे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्रामसेवकाला हात पाय बांधून हॉटेलमध्ये डांबून ठेवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ग्रामसेवक महेश कुमार खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आपल्याकडून ७३ हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचे तसेच चार चाकी गाडी बळजबरीने ताब्यात घेत अजून दीड लाखाची मागणी केल्याचा आरोप देखील खाडे यांनी केला आहे. याप्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय ३८) रा. कुडजे ता. हवेली जि. पुणे व त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवक खाडेंचे आरोप
ग्रामसेवक खडे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास ग्रामसेवक खाडे शासकीय काम आटोपून घरी निघाले असता त्यांना कुडजे गावच्या नजीक असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात आरोपींनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. यावेळी आरोपींनी त्यांना, हाॅर्न का वाजवला आशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली. तेथून त्यांना सरपंचांच्या हॉटेलवर घेऊन जाऊ आणि काय आहे तो विषय मिटवू असे म्हणून गाडे यांना त्यांच्याच चारचाकी गाडीने दगडे फार्म हाऊसकडे घेऊन गेले. तेथे त्यांचे हात पाय दोरीने बांधून हॉटेलच्या खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले.
आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला औषध पाजून मारून टाकू आशी धमकी देऊन त्याच्या बॅक खात्यातील होते ते आणि मित्रांकडून काही रक्कम घेऊन एकुण ७३ हजार रूपये गुगल-पे वरून घेण्यात आले. तसेच खडे यांच्या जवळील चारचाकी गाडीची चावी घेत उद्या दिडलाख रूपये आणून नाही दिले तर तुझ्या पुर्ण कुटुंबाला मारून टाकू आशी धमकी दिली.
त्यानंतर पैसे आणून देण्याचा बोलीवर आरोपींनी खाडे यांना सोडून दिले. यानंतर खाडे यांनी मित्र, नातेवाईक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. याबाबत खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवर उत्तमनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार याबाबत अधिक तपास करीत आहे