अहमदाबाद – पहिल्या सामन्यात चेन्नईचा पाच विकेट्सने पराभव करणाऱ्या गुजरात संघाला धक्का बसला असून न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडला आहे.
चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यातच क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात तो फलंदाजीलाही उतरला नाही आणि त्याच्या जागी ऐनवेळी साई सुदर्शनला अंतिम संघात खेळवावे लागले. विल्यमसनची पहिल्याच सामन्यातून झालेली एक्झिट गुजरातसाठी मोठा धक्का असेल.
कारण विल्यमसन हा मॅचविनर खेळाडू असून, केव्हाही स्वबळावर सामना फिरविण्याची त्याच्यात क्षमता आहे. गेल्या हंगमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या विल्यमसनला आयपीएल 2023 लिलावादरम्यान गुजरातने 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
#IPL2023 : “BCCI अहंकारी, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये…”, पाकचे माजी PM बरसले
विल्यमसनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 77 सामन्यांमध्ये 36.22 च्या सरासरीने फलंदाजी करत 2101 धावा केल्या आहेत, ज्यादरम्यान त्याने 18 अर्धशतके झळकावली आहेत.