Lok Sabha Election 2024 । राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता राज्यात सर्व पक्षांनी सभांचा धडका सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत.
आज मंगळवारी धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहे. अर्चना पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर मैदानात आहेत. यावेळी मोदी यांनी प्रचार सभेत बोलतांना पुन्हा एकदा गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामाचा आराखडा सांगितलं. तसेच काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे.
Lok Sabha Election 2024 । काँग्रेसवर केले गंभीर आरोप
काँग्रेस सरकार शेतकऱ्याच्या वाटायचे पैसे पळवायचे, आमच्या सरकारने सोयाबीनवर काँग्रेस सरकारहून जास्त पैसे दिले. तुमचे जीवन बदल्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करतोय, मात्र इंडिया आघाडीतील नेते माझ्यावर टीका करत आहे. ते पुढे म्हणाले त्यांच्या मोहब्बत च्या दुकान फेक व्हिडिओ बनवले जात आहे . मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप केला जात आहे असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसवर आरोप करतांना ते पुढे म्हणाले, देशातील महिल्यांचे दागिने आणि मंगळसूत्र काँग्रेस लुटण्याचा विचार करत आहे, ते देशातील लोकांची संपत्ती लुटण्याचा विचार करत आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.
Lok Sabha Election 2024 । भाजपच्या खात्यात मतदान करा
अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना मतदान केल्यास भाजपच्या खात्यात मतदान होणार आहे ते पुढे म्हणाले माझे एक पर्सनल काम करा घरोघरी जाणून सर्वाना माझ्यालकडून नमस्कार करा असेही ते धाराशिवच्या सभेत हणाले आहे.
पहा लाईव्ह
LIVE |📍धाराशिव | मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा 🪷 @narendramodi #Maharashtra #Narendramodi #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024 https://t.co/0E4NIKV9zV
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 30, 2024
हे वाचले का ? तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार ; मोदींचा हल्लाबोल