पुणे – व्यवसायिक व्यवहारातून आणि जमिनीच्या वादातून धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणात मुख्य आरोपी गणेश घावरे तीन वर्षांनी तुरूंगाबाहेर येणार आहे. त्याला सत्र न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांनी जामीन मंजुर केला आहे.
या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच जणांना जामीन मंजुर झाल्यानंतर त्याने ऍड. प्रतिभा पवार यांचामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
ऍड. पवार यांना ऍड. राकेश सोनार, ऍड. पूजा शिंदे आणि ऍड. रचना जैन यांनी मदत केली. नऱ्हे येथे जून 2020 मध्ये सुनील लागोरे यांचा खून झाला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले आहे. पोलिसांनी गोळा केलेला पुरावा विश्वासार्ह नसल्याचा युक्तीवाद ऍड. प्रतिभा पवार आणि ऍड. राकेश सोनार यांनी केला.