बॉलीवूड बादशहा शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सुहानाच्या हातात एक मोठा पुष्पगुच्छ दिसत आहे. ट्युलिप्स आणि गुलाबांच्या फुलांनी सजवलेला हा पुष्पगुच्छ पाहून किंग खानची मुलगी सुहाना या फोटोत सोजवळ दिसत आहे. हा फोटो सुहानाच्या फॅन पेजने शेअर केला आहे. सुहाना नुकतीच लंडनला सुट्टी घालवण्यासाठी गेली होती, तिथे तिला हा पुष्पगुच्छ मिळाला.
View this post on Instagram
फोटोमध्ये सुहाना खान बिना मेकअप लूकमध्ये दिसत आहे. सुहानाने फिकट गुलाबी रंगाचा टॉप आणि जॅकेट घातले आहे.सुहानाची हेअर स्टाइलही खूप सोबर आहे. तिने तिचे सर्व केस एका स्लीक बनमध्ये बांधले होते. फोटोमध्ये सुहाना लाजाळूपणे फुलांचा गुच्छ हातात धरताना दिसत आहे. फोटोमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुहाना पुष्पगुच्छाकडे पाहून मंद हसत आहे.
शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर सुहानाचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. सुहाना दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडते.
लवकरच सुहानाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सुहाना खान फिल्ममेकर झोया अख्तरच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द आर्चिज’मध्ये सुहाना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
झोया अख्तरचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना व्यतिरिक्त या चित्रपटात इतर अनेक स्टार किड्स देखील दिसणार आहेत जे झोयाच्या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण करतील. हा चित्रपट अँग्लो-इंडियन समुदायावर आधारित असेल. 60 च्या दशकावर आधारित या चित्रपटात सुहाना व्यतिरिक्त जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय अमेरिकन कॉमिक बुक मालिकेचे रूपांतर आहे.