तेलगू स्टार समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी ‘शकुंतलम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथाचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. समंथा तिचे नवीन घर खरेदी करण्यासाठी देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिशन मजनू अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नंतर आता समंथा रुथ प्रभूनेही मुंबईत एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे.
समांथाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सूर्यास्ताचा फोटो पोस्ट केला आहे जो तिने तिच्या वर्तमान स्थानावरून क्लिक केला आहे. दुसरीकडे, Siasat.com च्या वृत्तानुसार, समांथाचा हा फोटो मुंबईतील कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधला नसून, मुंबईतील एका उंच इमारतीतून क्लिक केल्याचे दिसते. समंथाने स्वप्नांच्या शहरात नवीन घर घेतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, ‘यशोदा’ अभिनेत्रीने मुंबईत समुद्राचे दृश्य असलेले आलिशान तीन बेडरूमचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, समंथा सध्या राज आणि डीकेसोबत तिच्या दुसऱ्या हिंदी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वरुण धवनसोबतची ही तिची मोस्ट अवेटेड ‘सिटाडेल’ मालिका आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाला आता बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची इच्छा असल्याच्याही बातम्या येत आहेत.