पुणे – हवेली तालुक्यातील कोंढवे-धावडे येथे हवेली तालुका कला क्रिडा व सामाजिक संस्थेच्या वतीने हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी कोंढवे-धावडे येथील स्वर्गीय वस्ताद लक्ष्मण श्रीपती धावडे क्रीडानगरीमध्ये हा कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.
माजी युवा उपसरपंच व खडकवासला भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस निखिल लक्ष्मण धावडे आणि स्मिता सुरेश धावडे यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत महिला गट, कुमार गट आणि सिनियर असे तीन गटात कुस्त्या होणार आहे. कुस्तीप्रेमींना बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली असून, मैदानात तीन हजार नागरिक बसतील अशी व्यवस्था आहे. असे निखिल धावडे यांनी सांगितले.