मुंबई – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. मात्र, अखेर काल सिद्धार्थ आणि कियारा यांचं लग्न जैसमेरमध्ये पार पडलं आहे. ‘शेरशाह’ रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड होते. ‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता. तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड ‘डिंपल चीमा’च्या रोलमध्ये दिसली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत असलेलं हे क्युट कपल लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्याही आयुष्यात 7 फेब्रुवारी 2023 हा दिवस खऱ्या अर्थानं संस्मरणीय आणि सुंदर दिवस ठरला आहे. राजस्थानमधील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा दणक्यात आणि उत्साही वातावरणात पार पडला.
या दोघांच्या विवाह सोहळ्याला त्यांचे कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांच्या साक्षीनं, शुभेच्छांसह कियारा मल्होत्रांच्या घरची सून झाली. 4-5 दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं.
दरम्यान, सिद्धार्थ कियारा यांनी आता लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कियाराने फोटो शेअर करताना म्हटलं की, आता आपलं पर्मनंट बूकिंग आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थला सेहरा बांधण्याचा विधी झाला. त्यावेळी नवऱ्याकडच्या वऱ्हाडी मंडळींनाही फेटे बांधण्यात आले.त्यानंतर सिद्धार्थची वरात निघाली. ही वरात राजेशाही थाटाची होती.