कंपाला (युगांडा) – चीनच्या कर्जाच्या विळख्यात श्रीलंका, पाकिस्तान यासारखे देश अडकले असताना युगांडासारख्या आफ्रिकेतील मागास देशाने चीनच्या सहकार्यतून उभारण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पातून माघार घेण्याचे धाडस दाखवले आहे.
“चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी’च्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या स्टॅन्डर्ड गॉज या 2.2 अब्ज डॉलरच्या रेल्वेमार्गाचे काम या कंपनीला देण्यात आले होते. ते आता काढून घेण्यात आले असून यापी मरकेझी या तुर्की कंपनीला देण्यात आले आहे.
केनियातील मलाबा या शहरापासून युगांडाची राजधानी कंपालापर्यंतच्या 273 किलोमीटरच्या या रेल्वे प्रकल्पासाठी 8 वर्षांपूर्वी कंत्राट देण्यात आले होते. तेंव्हा या प्रकल्पासाठी 2.2 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित होता. चीनमधील एक्सपोर्ट-इम्पोर्ट बॅंकेने या प्रकल्पासाठी कर्ज देण्यास नकार दिला होता. आता तुर्की कंपनीबरोबर या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या वित्तसहाय्याच्या मॉडेलमध्ये बदल केले जाणार आहेत.
Australia : खलिस्तानींकडून आणखीन एका मंदिराचे विद्रुपीकरण; भिंतींवर हिंदूविरोधी…
चीनच्या इम्पोर्ट-एक्सपोर्ट बॅंकेने या प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे युगांडाचे ऍटर्नी जनरल किरयोवा किवानुका यांनी प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर सांगितले. चीनच्या बॅंकेने या प्रकल्पासाठीच्या अर्थसहाय्याच्या प्रस्तावावर वर्षभरापेक्षा अधिक काळापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे युगांडा सरकारला अन्यठिकाणहून अर्थसहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करणे भाग पडले, असेही त्यांनी सांगितले,