मेलबर्न – मेलबर्नमधील आणखीन एका हिंदू मंदिराचे खलिस्तानी समर्थकांकडून विद्रुपीकरण करण्यात आले आहे. कॅरम डाऊन येथील श्री शिव विष्णू मंदिराची काही अज्ञात समाजकंटकांकडून विद्रुपीकरण करण्यात आले. मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी ग्राफिटी रंगवण्यात आली आहे.
आठवड्यारापूर्वीच एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. दिनांक 12 जानेवारीला मेलबर्नचे उपनगर असलेल्या मिल पार्कमधील बीएपीएस स्वामी नारायण मंदिरात घुसून खलिस्तानी समर्थकांनी मंदिराची नासधूस केली होती.
हिंदू मंदिरांची अशाप्रकारे नासधूस आणि विद्रुपीकरण केले गेल्याबद्दल स्थानिक हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गाचा सनदशीर मार्गाने निषेध नोंदवण्यात येईल आणि शांततेने प्रार्थना करणे यापुढेही सुरूच ठेवले जाईल, असेही स्थानिक हिंदूंनी म्हटले आहे.