पुणे – कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत , राज्य कृषी मंत्री असताना 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यात राजीक्या वर्तुळात खळबळ माजली आहे. आज पुण्या मध्ये या घोटाळ्याचा निषेध करत युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे. यावेळेस काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, आणि अन्य कार्यकर्त्या उपस्थित होते.
प्रामुख्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अलका चुकत जोरदार निदर्शना देण्यात आल्या आहेत. सातत्याने महिलांबद्दल अपमानस्पद वक्तव्य करणार, जिल्हाधिकारी यांना दारू पितो का ? विचारण, आणि आता उघड झालेल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात बसण्याचा अधिकार नाही एकनाथ शिंदेने त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अशी मागणी करत काँग्रेसने आज पुण्यामध्ये आंदोलन केला आहे.