बारामती – आर्मी TES म्हणजे तांत्रिक प्रवेश योजना, नावाप्रमाणेच अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात प्रवेश करण्यासाठी ही एक तांत्रिक प्रवेश परीक्षा आहे. आर्मी TES, SSB साठी पात्र होण्यासाठी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. TES इच्छुकांना 12 वी नंतर भारतीय सैन्याच्या तांत्रिक शाखेत सामील होण्याची संधी आहे. परंतु रिक्त पदांनुसार उमेदवार पायदळ, तोफखाना इत्यादी इतर क्षेत्रात देखील सामील होऊ शकतात. या परीक्षेसाठी सर्व अर्जा मधून फक्त 20000 परीक्षार्थी पुढील टप्प्यास म्हणजेच SSB साठी निवडले जातात.
आचार्य अकॅडमी मधील प्रज्वल राऊत हा या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 6 वा आला आहे. या परीक्षेसाठी त्यानी बारामतीच्या आचार्य अकॅडमी मधून आर्मी टी इ एस परीक्षेसाठी मार्गदर्शन घेतले. स्वतः एन डी ए परीक्षा उत्तीर्ण असलेले सुमित सिनगारे यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रज्वलच्या विक्रमी यशाबद्दल आचार्य अकॅडमी येथे सत्कार सोहळा घेण्यात आला. त्यावेळी प्रज्वल आणि त्याच्या आई वडिलांनी आचार्य अकॅडमी चे आभार मानले. प्रज्वलने या परीक्षेसाठी भरपूर मेहनत घेतली. सुमित सिनगारे यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले.
या त्याच्या यशाबद्दल आचार्य अकॅडमीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे, संचालक कमलाकर टेकवड , संचालक सुमित सिनगारे व संचालक प्रवीण ढवळे यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल राऊत कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. प्रज्वल चे यश सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.