दोहा – कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वकरंडक ( FIFA WorldCup 2022 ) फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य फ्रान्सने तुलनेने दुबळ्या मोरोक्कोचा पराभव केला व थाटात अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता त्यांची अर्जेन्टिनाशी विजेतेपदाची लढत येत्या रविवारी रंगणार आहे. मोरोक्कोच्या जिद्दी व लढाऊ खेळाची अखेर निराशाजनक झाली. मोरोक्कोच्या पराभवामुळे आफ्रिकी तसेच अरेबियन देशाचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
Kane Williamson | केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व
मोरोक्कोवरील विजयामुळे फ्रान्सने स्पर्धेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा तर एकूण चौथ्यावेळी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हा सामना फ्रान्सने 2-0 असा जिंकला व लिओनेल मेस्सीच्या अर्जेन्टिनालाही इशारा दिला आहे. त्यांनी या लढतीत आक्रमणासह बचावही भक्कम असल्याचे सिद्ध करत मोरोक्कोला एकही गोल करण्याची संधीच मिळू दिली नाही. आता तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोचा सामना क्रोएशियाशी येत्या शनिवारी होणार आहे. तर दुसरीकडे फ्रान्सचा विजेतेपदाचा सामना अर्जेन्टिनाशी येत्या रविवारी होणार आहे.
Kane Williamson | केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व
या सामन्याला प्रारंभ झाल्यावर लगेचच पाचव्याच मिनिटाला थियो हर्नांडेजने गोल करत संघाला पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या पहिल्या हाफमध्ये त्यानंतर कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. फ्रान्सनेही मिळालेल्या चार संधी वाया घालवल्या. तर मोरोक्कोने यापूर्वीच्याच सामन्यांप्रमाणे या सामन्यातही आपला भक्काम बचाव दाखवून दिला. मात्र, त्यात सातत्य न राखल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दुसरा हाफ सुरू झाल्यावरही मोरोक्कोच्या आक्रमकांनी फ्रान्सची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर फ्रान्सचा स्ट्रायकर खेळाडू रेडल कोलो माऊनी याने 79 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. ही आघाडी कमी करण्यासाठी मोरोक्कोला जितक्या संधी मिळाल्या त्याचा लाभ घेता आला नाही व त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या विजयाच्या जोरावर फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.
यापूर्वी फ्रान्सने 2018 साली अंतिम फेरी गाठली होती. यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवत स्पर्धेच्या इतिहासातील तिसरे विजेतेपद प्राप्त करण्याचा फ्रान्सचा प्रयत्न राहील. स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने संघाने उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली असून आता स्टार्सचा भरणा असलेल्या या दोन संघात विजेतेपदाची लढत होणार आहे.