लंडन – इंग्लंडचा माजी कर्णधार व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफ ( Andrew Flintoff ) येथे एका कार अपघातात जखमी झाला. त्याला एअर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा खुलासा इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केला आहे.
मेस्सीने ‘या’ कारणामुळे दिले निवृत्ती घेण्याचे संकेत, म्हणाला…
फ्लिंटॉफ कार चालवत असताना हा अपघात झाला असून बघ्यांनी सांगितल्यानुसार त्याचा वेग विलक्षण होता व त्यामुळेच त्याचे गाडीवरचे नियंत्रण चुकले व हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. तो बीबीसी या वाहिनीच्या एका मालिकेचे चित्रीकरण करत असताना हा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याबबात अद्याप रुग्णलयाच्या सूत्रांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.
*Andrew Flintoff 🏴 has been taken to hospital after being involved in an accident!*#Cricket #England pic.twitter.com/zfTapCm5ej
— Roshan Abeysinghe (@RoshanCricket) December 14, 2022
चित्रीकरणावेळी असलेल्या स्वयंसेवकांनी एअर ऍम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात दाखल केले. फ्लिंटॉफला झालेला हा दुसरा अपघात असून यापूर्वी 2019 साली एसेच एका मालिकेचे चित्रीकरण करत असताना अपघात झाला होता व त्यावेळीही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करत उपचार घ्यावे लागले होते. फ्लिंटॉफने इंग्लंडकडून 69 कसोटी, 141 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2009 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.