दोहा – कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेन्टिनाने थाटात अंतिम फेरी गाठल्यावर भावुक झालेल्या स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याने निवृत्तीचे संकेत देत चाहत्यांना धक्का दिला आहे. पुढील विश्वकरंडक स्पर्धा चार वर्षांनी होत आहे, माझे आता 35 वय आहे त्यामुळे त्या स्पर्धेत मी खेळू शकेन असे मला वाटत नाही, अशा शब्दांत मेस्सीने आपले मत व्यक्त केले.
अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल; केली ‘ही’ मोठी कामगिरी
मेस्सीने उपांत्य लढतीत क्रोएशियाविरुद्ध गोल केल्यावर आनंद तर व्यक्त केलाच मात्र, त्याचवेळी त्याने येत्या काही काळात निवृत्ती जवळ येणार आहे, असेही भाष्य केले आहे. मेस्सीने या गोलसह यंदाच्या स्पर्धेतील आपला पाचवा गोल साकार केला. तसेच त्याने संघातील नवोदितांच्या गुणवत्तेचेही कौतुक केले.
अर्जेन्टिना संघाला विश्वकरंडक उंचावून द्यायचा आहे. हेच स्वपुन घेऊन मी इतकी वर्षे खेळलो. आता आम्ही यंदाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहोत. अशी संधी वारंवार येत नाही त्यामुळे आम्ही सगळेच क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्यासाठी सज्ज आहोत, असेही मेस्सी म्हणाला.
अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल; केली ‘ही’ मोठी कामगिरी
कारकिर्दीला सुरुवात केल्यावर विक्रम करायचे असे मी ठरवले नव्हते. विक्रम होतच असतात; परंतु त्या कामगिरीमुळे संघाचा विजय झाला तरच त्या विक्रमांना अर्थ राहतो. सध्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा आम्ही सांघिक खेळाच्या जोरावर जिंकत आहोत, त्यामुळे विश्वकरंडक जिंकला तर आमचे सगळ्यांचेच स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही मेस्सीने सांगितले.