Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू

काठमांडु : नेपाळमधील धार्मिक समारंभातून घरी जाणाऱ्या लोकांनी खचाखच भरलेल्या बसला कावरेपालन चौकात अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास ग्रामीण नगरपालिकेच्या चालाल गणेशस्थानातील सल्लाफेड येथे हा अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
त्यातील तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा विविध रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 39 जण होते.
राजधानी काठमांडूपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेला, बेथनचौक परिसर खडकाळ रस्ते आणि अरुंद उतारांनी नटलेला आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Meghalaya : मेघालयात तृणमूलसह चार आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश
जखमींवर शीर मेमोरियल हॉस्पिटल आणि धुळीखेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाहन ब्रतबंदच्या धार्मिक मिरवणुकीतून लोकांना घरी घेऊन जात असल्याचे सांगण्यात येत आहे.




