नवी दिल्ली :– लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू उद्यापासून मलेशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. (Vice Chief of Army Staff on a three day visit to Malaysia) लष्कर उपप्रमुख आपल्या भेटीदरम्यान मलेशियाचे वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेत्यांसमवेत अनेक बैठका करणार आहेत.
मलेशियन लष्कराचे उपप्रमुख आणि तेथील सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ यांच्याशी उपप्रमुख चर्चा करणार आहेत. मलेशियन संरक्षण आणि सामरिक नीती अभ्यासविषयक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशीही उपप्रमुख व्यापक चर्चा करतील.
आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन, साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या… इतिहास आणि महत्त्व
सध्या सुरू असलेल्या हरिमाऊ शक्ती या संयुक्त सरावांदरम्यान विविध प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांचीही लष्कर उपप्रमुख पहाणी करतील आणि सैनिकांशी संवाद साधतील.