मुंबई – बॉलीवूडचे पॉवर कपल अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगनने अद्याप चित्रपटांमध्ये पदार्पण केले नसेल, परंतु तिने आधीच एक मोठा चाहता वर्ग जमा केला आहे, जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच काजोलने तिच्या मुलीच्या लोकप्रियतेबद्दल खुलेपणाने सांगितले. मीडियाशी बोलताना अभिनेत्रीने कबूल केले की तिच्या मुलीचे चाहते जगभरात आहेत.
मीडियाशी बोलताना काजोलने तिच्या मुलीशी तुलना केल्यावर म्हणाली,’आमच्या काळात सोशल मीडिया नव्हता. आजच्या मुलांच्या तुलनेत आमचे आयुष्य खूप सोपे होते. मी अभिनेत्री तनुजाची मुलगी आहे हे लोकांना माहीत होते, पण आजच्या गोष्टी त्याप्रमाणे घेतल्या गेल्या नाहीत. न्यासा सिंगापूरमध्ये शिकत आहे. अनेकवेळा असे घडले की ती बसमधून प्रवास करत असताना लोकांनी तिचा ऑटोग्राफ घेतला.’
काजोलने सांगितले की, मला स्वतःला आश्चर्य वाटते की तिचे चाहते जगभरात आहेत. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी मला कोणीही ओळखत नव्हते. कुठेही सहज जाऊ शकत होते फिरू शकत होते. परदेशी मला ओळखत नव्हते. पण न्यासा कुठेही गेली की लगेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.’
रेवती दिग्दर्शित सलाम वेंकी हा चित्रपट ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. काजोल, विशाल जेठवा, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि आहाना कुमरा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. काजोल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.