मुंबई – अभिनेते अनिल कपूर जितके आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात तितकेच ते आपल्या हटके स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध आहेत. नुकतंच अनिल कपूर यांनी केलेलं ट्विट चांगलच लक्षवेधी ठरतंय. अनिल कपूर यांनी केलेलं ट्विट हे मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी याच्याशी संबंधित आहे. या ट्विटद्वारे अनिल कपूर यांनी चाहत्यांना एक आवाहन देखील केलं आहे.
अनिल कपूर आणि जितेंद्र जोशी यांनी नेटफ्लिक्सवरील ‘थार’ या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती. मे २०२२ रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आता याच चित्रपटासाठी जितेंद्र जोशीला फिल्म फेअर ओटीटी अवॉर्डमध्ये सहाय्यक अभिनेत्याचं नामांकन मिळालं आहे. त्यासाठीच वोट करण्याचं आवाहन अनिल कपूर यांनी जितेंद्र जोशींचा एका फोटो पोस्ट करत केलं आहे.
Vote Now!https://t.co/M3wMET7ZQ9 pic.twitter.com/YfJTa4Y3uj
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 6, 2022
अनिल कपूर यांनी या चित्रपटातील इतर कलाकारांचे फोटो देखील पोस्ट केले आहे. थार या चित्रपटात अनिल कपूर यांनी पोलिसांची भूमिका साकारली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या आगळ्यावेगळ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला होता.