मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आणि त्याच मुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू लागली आहे. सध्या या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.
दरम्यान, अश्यातच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे’, असे अजब विधान केले आहे. भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहेत. सध्या प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी हे व्यक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या!’ असं ट्विट राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्या या व्यक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.