मुंबई : राज्याचे क्रिडामंत्री गिरीश महाजन यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये 49 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उदघाटन केले. त्यावेळी त्यांनी कबड्डी हा ताकदीचा आणि स्कीलचा मैदानी खेळ आहे. मी कबड्डी खेळत असल्यामुळे इतक्या वेळेला आमदार झालो असल्याचे वक्तव्य केले. तसेच या खेळात कोणाची टांग कशी ओढायची, कोणाची कॅच कशी करायची, समोरच्याला कसं टिपायचं आणि एखादा खेळाडू एकतच नसेल तर त्याला ग्राऊंडच्या बाहेर कसं पुश करायचे हे या खेळात मी शिकलो असल्याचे महाजन म्हणाले.
उदघाटन प्रसंगी महाजन यांनी राजकारणातही मी तेच केलं, कोणाची टांग कशी खेचायची, कोणाला कसा बाद करायचा, कोणाला कसं पाडायचं हे मी या खेळातून शिकल्याचे म्हटले. तसेच खेळात असेल किंवा राजकारणात असेल सगळं स्कील सारखंच असते असे महाजन म्हणाले. कबड्डी हा ताकदीचा तसेच स्कीलचा खेळ आहे. मी कबड्डी खेळत असल्यामुळं इतक्या वेळेला आमदार झालो आहे. या खेळाचा मला राजकारणात फायदा होत असल्याचे महाजन म्हणाले. कारण राजकारणात कोणाल कसं बाद करायचं आणि कोणाला कसं पाडायचं हे मी कबड्डीतूनचं शिकलो असल्याचे महाजन यांनी सांगितले.
कबड्डी या अस्सल मराठमोळ्या ग्रामीण खेळाचा विकास आणि प्रसार व्हावा, नवोदित, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेडमध्ये 49 व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी कब्बडीमुळं मी कसा आमदार झालो याचा किस्सा सांगितला. तसेच राजकारणात कबड्डीचा त्यांना कसा फायदा होतो हे त्यांनी सांगितले.