ख्राईस्टचर्च – यजमान न्यूझीलंड व भारत ( NZ vs IND ) यांच्यात येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना होत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून दुसरा सामना पावसाने रद्द करावा लागला होता. या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील तर सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर न्यूझीलंडला मालिका विजयाची संधी लाभली आहे.
“वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित अन् विराटला…” सुनील गावस्कर संतापले!
न्यूझीलंडविरुद्धची ( NZ vs IND ) तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. संघाने त्रिशतकी धावा करुनही न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघाला गोलंदाजांकडून जास्त जबाबदारीची अपेक्षा राहणार आहे.
“वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित अन् विराटला…” सुनील गावस्कर संतापले!
न्यूझीलंडची कसलेली फलंदाजी पाहता भारताच्या नवोदित गोलंदाजांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. तसेच फलंदाजीतही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अपयशी ठरत असूही ऋषभ पंतला सातत्याने संधी देणे टीकेचा विषय बनत चालले असले तरीही आता अखेरच्या लढतीत त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळवणार का असाही प्रश्न आहे.
यंदाच्या मोसमात भरात असलेला सूर्यकुमार यादवकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत. तसेच कर्णधार शिखऱ धवन, शुभमन गिल व श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठ्या खेळीची गरज आहे. केवळ धावसंख्या मोठी उभारल्यावर गोलंदाजांना दर्जानूसार कामगिरी करावी लागणार आहे.भारताचा या मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 गडी राखून पराभव झाला होता. तर दुसरा सामना केवळ 12.5 षटकांत खेळ झाल्यावर पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता.
— BCCI (@BCCI) November 29, 2022
न्यूझीलंडने मात्र, घरच्या मैदानावर खेळताना सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदाच्या मोसमात वारंवार अपयशी ठरलेल्या कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भरात येत असल्याचे सिद्ध केल्यामुळे भारतासमोर त्याला कसे रोखायचे हा प्रश्न आहे. त्यातच त्यांचा टॉम लॅथम प्रचंड भरात असून त्यानेच पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केल्याने त्यांची फलंदाजी जास्त बळकट बनली आहे. त्यांची गोलंदाजी फारशी यशस्वी ठरत नसली तरीही टीम साउदी, मॅट हेनरी, लॉकि फर्ग्युसन व मिचेल सॅन्टनर हे या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखू शकतात.
पावसाचे सावट कायम
दुसरा ( NZ vs IND ) सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नसल्याने उद्या होणार असलेला तिसरा सामना मालिकेचा निकाल लागण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र, सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पावसाचा फटका या सामन्यालाही बसेल असा अंदाज येथिल हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे हा सामना अपूर्ण राहिला किंवा रद्दच झाला तर न्यूझीलंड मालिका विजय प्राप्त करेल.
उद्या तिसरा एकदिवसीय सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड
वेळ ः भारतीय प्रमाणवेळेनूसार सकाळी 7 पासून
ठीकाण ः ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड
थेट प्रक्षेपण ः डीडी स्पोर्टस