हॅमिल्टन – भारत व न्यूझीलंड ( NZ vs IND ) यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पावसाच्या व्यत्ययानंतर 12.5 षटकांचा खेळ झाल्यावर रद्द करण्यात आला. या मालिकेतील पहिला सामना जिंकत यजमान न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता दुसरा सामना रद्द झाल्यामुळे मालिकेत बरोबरी करण्याची भारताची संधी हुकली.
हार्दिक अन् कृणालसोबत धोनीही दिसला दुबईत पार्टी करताना; व्हिडिओ व्हायरल!
आता ( NZ vs IND ) या दोन संघात येत्या बुधवारी ख्राईस्टचर्चला होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकत मालिका जिंकण्याची न्यूझीलंडला संधी आहे तर, भारताला बरोबरी करण्याची संधी आहे. हॅमिल्टनमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे नाणेफेकही उशिरा झाली. पाऊस थांबल्यावर झालेली नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली व भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली.
हार्दिक अन् कृणालसोबत धोनीही दिसला दुबईत पार्टी करताना; व्हिडिओ व्हायरल!
मात्र, पाचव्या षटकांत पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर हा सामना प्रत्येकी 29 षटकांचा खेळवला जाणार होता. मात्र, 12.5 षटकांनंतर पुन्हा सुरू झालेला पाऊस थांबलाच नाही व पंचांनी अखेर हा सामना होणार नसल्याचे जाहीर केले. त्यावेळी भारतीय संघाने 1 गडी गमावून 89 धावा केल्या होत्या. भारताचा कर्णधार शिखर धवन मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर लॉकी फ्ग्युसनकडे झेल देत 3 धावांवर बाद झाला.
त्यानंतर शुभमन गिलने 42 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 45 तर, सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार फटकावत नाबाद 34 धावा केल्या होत्या. आता हा सामना रद्द झाल्यानंतर भारताला ही मालिका जिंकता येणार नसली तरी बुधावीर होणार सामना जिंकत मालिकेत बरोबरी करता येणार आहे. याच दोन संघात याआधी झालेली टी-20 सामन्यांची मालिका भारताने जिंकली होती.
The 2⃣nd #NZvIND ODI is called off due to persistent rain 🌧️
We will see you in Christchurch for the third & final ODI of the series.
Scorecard 👉 https://t.co/frOtF7L9O4 #TeamIndia pic.twitter.com/QODRMWTQEN
— BCCI (@BCCI) November 27, 2022