ख्राईस्टचर्च – यजमान न्यूझीलंड व भारत ( NZ vs IND ) यांच्यातील बुधवारी होत असलेला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही संततधार पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पहिला सामना जिंकलेल्या न्यूझीलंडने ही मालिका 1-0 अशी जिंकली. या लढतीला प्रारंभ होण्यापूर्वीही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, त्यानंतर पाऊस थांबला व नाणेफेक करण्यात आली. कर्णधार केन विल्यमसनने भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली.
BCCI । भारताच्या टी-20 संघातून रोहित-कोहलीचा पत्ता कट होणार?
वॉशिंग्टन सुंदर व श्रेयस अय्यर वगळता भारताच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचा डाव 47.3 षटकांत 219 धावांवर संपला. न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेल व ऍडम मिल्ने यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. टीम साऊदीने 2 बळी घेतले. भारताच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन 28, शुभमन गिल 13, ऋषभ पंत 10, भरात असलेला सूर्यकुमार यादव 6 दीपक हुडा व दीपक चहर यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या.
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
अय्यरने जबाबदारीने फलंदाजी केली. मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने 59 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तळात वॉशिंग्टन सुंदरने मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करत अर्धशतक फटकावले. त्याने 64 चेंडूत 5 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. विजयासाठी 220 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने धडाकेबाज फलंदाजी केली.
सलामीवीर फिन ऍलेन व डेव्ह कॉनवे यांनी संघाला 97 धावांची दमदार सलामी दिली. ऍलेनने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो उमरान मलिकच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवकडे झेल देत 57 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 54 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर कर्णधार विल्यमसन खेळपट्टीवर दाखल झाला व त्याचवेळी 18 वे षटक सुरू असताना पुन्हा एकदा पावसाला प्रारंभ झाला व खेळ थांबला.
The third & final #NZvIND ODI is called off due to rain 🌧️
New Zealand win the series 1-0.
Scorecard 👉 https://t.co/NGs0HnQVMX #TeamIndia
📸 Courtesy: Photosport NZ pic.twitter.com/73QtYS5SJm
— BCCI (@BCCI) November 30, 2022
तेव्हा न्यूझीलंडची 1 बाद 104 धावा अशी स्थिती होती. कॉनवे 51 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 38 धावांवर खेळत होता. विल्यमसनने खातेही उघडलेले नव्हते. पावसाचा खेळ सुरू झाल्यावर पंचांनी वारंवार पाहणी केली अखेर हा सामना होणार नसल्याचे जाहीर केले. या मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने न्यूझीलंडने मायदेशात पुन्हा एकदा भारताविरुद्धची ( NZ vs IND ) एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा टॉम लॅथम मालिकेचा मानकरी ठरला.