पुणे – संयम, एकाग्रता, धैर्य आईकडूनच शिकलो. माझ्या खेळावर तिच्या याच संस्कारांचा प्रभाव आहे, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार व तंत्रशुद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले आहे. द्रविड याच्या आई डॉ. पुष्पा द्रविड यांनी लिहिलेल्या कॅनव्हास ते वॉल या इ-पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित असताना राहुलने दिलखुलास मत व्यक्त केले.
#NZvsIND | टीम इंडियाचे टेन्शन वाढले! मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द
हाती घेतलेले कोणतेही काम अपूर्ण ठेवायचे नाहीच तर ते वेळेपूर्वीच पूर्ण करायचे. समोर आलेल्या अडचणींचा सामनाही धैर्याने करायचा व परिस्थिती कीतीही विरोधात्मक असली तरीही आपला संयम ढळू द्यायचा नाही ही आईची शिकवण होती. मला एक क्रिकेटपटू म्हणून खेळताना तसेच आता नवनव्या जबाबदाऱ्या पार पाडताना याच मार्गदर्शनाचा उपयोग होतो, असे मत द्रविडने यावेळी व्यक्त केले.
#NZvsIND | टीम इंडियाचे टेन्शन वाढले! मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द
द्रविड सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे तसेच कार्यबाहुल्यामुळे तो या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, असेच त्याच्या आई पुष्पा यांनी सांगितले होते. मात्र, तो अचानक या कार्यक्रमाला उपस्थित राहिला व आईसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तसेच त्याच्या नम्र व स्थितप्रज्ञ स्वभावाची प्रचितीही यावेळी सगळ्यांना आली कारण तो आपल्या आईसह व्यासपीठावर न बसता समोरच्या रांगेतील एका खुर्चीत बसला व त्याच्या याच कृतीने पुणेकरांची दादही घेऊन गेला. या कार्यक्रमानंतर त्याने उपस्थितांशी दिलखुलास गप्पाही मारल्या. बंगळुरूत राहात असला तरीही त्याने आपण अस्खलीत मराठी बोलतो हे देखील दाखवून दिले.