लखनौ – एकदिवसीय मालिकेत पाहुण्या न्यूझीलंड संघाला व्हाईटवॉश देणाऱ्या भारताला टी-20 मालिकेच्या रांची येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात 21 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मालिकेत सध्या 1-0 ने पिछाडीवर असणाऱ्या भारतासाठी येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळविणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
Womens U19 T20 World Cup | कोण ठरणार पहिला विश्वविजेता? भारत-इंग्लंड संघात उद्या अंतिम सामना
फिरकीसाठी अनुकुल असणाऱ्या रांचीच्या खेळपट्टीवर भारताला खेळणे सोपे असताना, कर्णधार हार्दिक पंड्या व कंपनीला किवी संघाने आश्चर्यचकित केले. भारताकडून वाशिंग्टन सुंदरने गोलंदाजी व फलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी केली मात्र, बाकी संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रांचीप्रमाणे रविवारच्या सामन्यातही लखनौ मैदानाची खेळपट्टी फिरकी व फलंदाजांना अशा दोहांना मदत करणारी आहे, त्यामुळे भारताला विजयासाठी कामगिरी उंचवावी लागणार आहे.
Dinesh Karthik । भारताच्या कॅप्टन बदलाबदलीच्या निर्णयांबाबत दिनेश कार्तिकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
दुसरीकडे, मिचेल सॅंटनर व किवी कंपनी दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. “पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना खेळपट्टीने आश्चर्यचकित केले, परंतु पाहुण्या संघाने चांगले क्रिकेट खेळले, त्यामुळेच निकाल त्यांच्याबाजूने लागला,’ असे कर्णधार पंड्याने पहिल्या सामन्याबद्दल बोलताना म्हटले आहे.
शुक्रवारच्या सामन्यात सॅंटनरने (4-1-11-2) अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करण्याआधी, सहकारी गोलंदाज मायकेल ब्रेसवेलने (4-0-31-2) फिरकीने भारताला धक्के दिले. त्याने इशान किशनसह हार्दिकलाही चुकीचा फटका खेळून परतीचा झेल घेण्यास भाग पाडले. भारताकडून सुंदरने गोलंदाजीत 2-22 अशी तर फलंदाजीत 28 चेंडूंत अर्धशतक झळकाविताना अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजीत उमरान मलिकला केवळ एकच षटक देण्यात आले. अर्थात, रविवारच्या सामन्यातही खेळपट्टी फिरकीस पोषक असल्याने त्याला जास्त षटके दिली जाण्याची शक्यता कमी असल्याने शिवम मावी, कुलदीप यादव व दिपक हुड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
संभाव्य संघः
भारत: शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जितेश शर्मा, मुकेश कुमार, पृथ्वी शॉ.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, हेन्री शिपले, बेन लिस्टर.