मुंबई – भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील मुक्काम आता संपला असून यात्रा २३ नोव्हेंबरपासून पुढच्या प्रवासाला जायला निघणार आहे.महाराष्ट्रातून आता ही यात्रा मध्यप्रदेशात दाखल होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेसला या यात्रेचा फायदा नक्की होईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. या यात्रेदरम्यान एका युट्युब चॅनलने राहील गांधींची मुलाखत घेत त्यांना काही विषयावर बोलत केलं.
युट्युबर समदिश भाटिया याच्याशी बोलताना राहुल गांधी यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले “एकदा मी माझ्या आईला म्हणजेच सोनिया गांधी यांना विचारले होते की मी हॅण्डसम दिसतो का ? त्यावर त्या म्हणाल्या होत्या,तू ठीकठाक दिसतो”. ते पुढे म्हणतात,माझी आई अशीच आहे ती थेट तुम्हाला आरसा दाखवते. माझे वडीलही असेच होते,बहीणही अशीच आहे संपूर्ण कुटुंब असच आहे. तुम्ही काही विचारा ते सगळं खरंच सांगतात. खोटी स्तुती करण माझ्या कुटुंबियांना कधीच जमत नसल्याचे यावेळी राहुल गांधींनी सांगितले.
यावेळी राहुल गांधी यांनी विविध गोष्टींवर भाष्य केले. आपली फॅशन स्टाईल अशा विविध गोष्टींबाबत राहुल गांधी युट्युबरसोबत मनमोकळे पणाने बोलताना दिसून आले. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास जरी संपला असला तरी ही यात्रा आता मध्यप्रदेशात जाणार आहे. राहुल गांधी आपली यात्रा अशाच उत्सहात सुरु ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. २३ नोव्हेंबरपासून यात्रेचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे.