नवी दिल्ली : गोव्यात 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना वेड लावले आहे.जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत.
दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत चिरंजीवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केलं आहे, “अभिनेता, डान्सर आणि निर्माता म्हणून चिरंजीवी यांनी 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चिरंजीवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे…खूप खूप अभिनंदन”. असे ठाकूर यांनी म्हटले आहे. चिरंजीवी यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलाच दबदबा आहे.
INDIAN FILM PERSONALITY @IFFIGoa
Sh Chiranjeevi Ji has had an illustrious career spanning almost four decades, w/ over 150 films as an actor, dancer & producer.
He is immensely popular in Telegu Cinema w/ incredible performances touching hearts!
Congratulations @KChiruTweets! pic.twitter.com/ZIk0PvhzHX
— Anurag Thakur (@ianuragthakur) November 20, 2022
चिरंजीवी यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 150 हून अधिक सिनेमांत काम केले आहे. 1978 साली त्यांनी ‘पुनाधिरल्लू’ या सिनेमाद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. चिरंजीवी यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आजवर त्यांना 10 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे Walter Veerayya आणि Bholaa Shankar हे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ते ‘गॉड फादर’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसले होते. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला.