ओटावा – कॅनडासारख्या प्रगत देशातही सध्या आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली असून डॉक्टरांच्या तीव्र टंचाईमुळे उपचार कसे करावेत हाच प्रश्न निर्माण झाला आहे स्ट्रेचरवरुन आणलेल्या गंभीर रुग्णालाही उपचार करून घेण्यासाठी शंभर ते सव्वाशे तास वेटिंग करावे लागत आहे 16 वर्षांच्या कालावधीत प्रथमच कॅनलला अशाप्रकारे वैद्यकीय व्यावसायिकांची टंचाई भासू लागली आहे सध्या कॅनडाला साडेसात हजार डॉक्टरची गरज आहे पण ते उपलब्ध होत नाहीत.
अनेक मोठ्या सरकारी रुग्णालयातील आणि खासगी रुग्णालयातील काही विभाग डॉक्टरच्या अनुपलब्धतेमुळे बंद करावे लागले आहेत सरकारने वैद्यकीय क्षेत्रावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या बजेटमध्ये वाढ करावी अशी मागणी कॅनडा मेडिकल असोसिएशनने केली आहे पण सरकारने अद्याप त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही.
गेल्या वर्षी या क्षेत्रासाठी जेवढी तरतूद केली होती ते सर्व पैसे खर्च झाल्यावर परिणाम काय होते हे पाहून आम्ही निर्णय घेऊ असे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हंटले आहे केवळ डॉक्टर नव्हे तर अनुषंगिक मेडिकल वैद्यकीय व्यावसायिकांचीही टंचाई कॅनडात भासत आहे त्यामुळे सरकारी सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टर किंवा नर्स यांना पून्हा सेवेत घेण्याबाबतचा विचार आता सुरू झाला आहे.