Anil Deshmukh Bail – अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत ईडीने युक्तिवाद पूर्ण केला असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हा युक्तिवाद केला. आर्थिक गैरव्यवहार हा अत्यंत गंभीर प्रकारचा गुन्हा असून, अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप हत्या आणि दहशतवादासारखेच असल्याचे सिंग यांनी आपल्या युक्तीवादादरम्यान म्हटले.
ही सुनावणी न्यायमूर्ती एन. जी. जमादार यांच्या खंडपीठासमोर पार पडली. ईडीकडून युक्तीवाद करण्यात आला की, अनिल देशमुखांनी केलेला जामीन अर्ज हा वैद्यकीय जामीन अर्ज नसल्यामुळे देशमुखांच्यावतीने उपस्थित केला जाणारा वैद्यकीय जामीनाचा मुद्दा चुकीचा आहे.
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? कमल नाथांनी स्पष्टच सांगितलं…
अनिल देशमुखांना वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रासलेले आहे. या व्यतिरिक्त कुठलाही गंभीर आजार अनिल देशमुख यांना नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय जामीन देखील मंजूर करू नये, असे ईडीने युक्तिवादात म्हटले आहे. ( Anil Deshmukh Bail )