कानपूर- बुंदेलखंडमधील भाजपच्या प्रदेश मंत्र्याला त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. प्रादेशिक मंत्री भाजपच्या एका महिला नेत्यासोबत अश्लील कृत्य करताना पकडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मोहित सोनकर नावाच्या या भाजप नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कानपुर में भाजपा नेता मोहित सोनकर को दूसरी महिला संग उनकी पत्नी ने रंगे हाथ पकड़ा जिसके बाद महिलाओं ने मिलकर मोहित सोनकर को पीट दिया… pic.twitter.com/U8qM3e7hz4
— Kavish Aziz Lenin (@azizkavish) August 20, 2022
या व्हिडिओमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष त्याला बेदम मारहाण करत आहेत. भाजपचा हा नेता कानपूर-बुंदेलखंडचा प्रादेशिक मंत्री असल्याचं सांगण्यात येत आहे.
पत्नीचे म्हणणे आहे की, ती अनेक दिवस पतीला समजावून सांगत होती. मात्र शनिवारी तिने पतीला गाडीत महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले आणि त्यानंतर कुटुंबीयांसह त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
महिला नेत्यावर गंभीर आरोप
भाजप नेत्याच्या पत्नीने महिलेविरोधात पोलिसांत तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. महिलेने पतीला गोवले आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे. महिलेचे अनेक महिन्यांपासून अवैध संबंध असल्याचा पत्नीचा आरोप आहे. महिलेने पतीला घराबाहेर काढण्यास सांगून मारहाण केल्याचा आरोप आहे. पत्नीने सांगितले की, शनिवारी रात्री ते दोघे व्हॉट्सअॅपवर चॅट करत होते. यानंतर मला घरी सोडून तो तिला भेटायला गेला. त्यानंतर आम्ही त्याला महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.
पोलिस तक्रार
याबाबत पोलिसांत तक्रार करून न्याय देण्याची मागणी केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.