राहू – दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते फिल्डगार्ड कंपनी तसेच दहिटणे – राहू रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून साईडपट्ट्या उखडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सांगूनही फक्त खड्डे बुजविण्याचे आश्वासन मिळत आहे, परिणामी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सहजपूरफाटा ते पाटेठाण पर्यंतच्या रस्त्याचे काम 3-4 वर्षांपूर्वी झाले होते. रस्त्याच्या डागडुजीची 5 वर्षे ठेकेदारांची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सहजपूर फाटा ते पाटेठाण – राहू पर्यंतच्या रस्त्यावर मोठे – मोठे खड्डे पडले आहेत. तरीही सहजपूर फाटा ते फिल्डगार्ड कंपनीपर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे काही लोकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्ता मंजूर आहे. परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबवला आहे. तसेच पावसामुळे अडचणी येत आहेत. लवकरच तात्पुरता मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
– हरिश्चंद्र माळशिकारे, सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड