प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 – फाळणी स्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला बॅंक ऑफ इंडिया पुणे येथील मुख्य शाखेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन बॅंकेचे ऊच छइ थ-खख यांच्या उपस्थितीत
3 स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी आणि मुली श्रीमती आर. एल. भुतानी, श्रीमती एम.एन. जोशी आणि श्रीमती परदेशी यांनी केले.
यावेळी श्री ऑगस्टीन, डीजीएम ऑडिट रवींद्र बोगा आणि पुणे मुख्य शाखा आणि विभागीय कार्यालयाचे कर्मचारी हे उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कथा आणि आघात यावेळी कथन केले. फाळणी काळातील वीरांच्या स्मरणार्थ असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बॅंक ऑफ इंडिया आणि सरकारचेही आभार मानले.