विश्रांतवाडी, दि. 14 (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी वडगावशेरी प्रभागाच्यावतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक-दत मंदिर चौक – भाजीमार्केट – स्टेला मेरी स्कूल – पुण्यनगरी सोसायटी – आनंदपार्क चौक – गणेशनगर चौक – सुंदरबाई मराठे शाळा -द्वारका मंगल कार्यालय पर्यंत पदयात्रा कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली.
स्वातंत्र्यानंतर देश उभारणीसाठी कॉंग्रेसने महत्त्वपूर्ण काम केले. पण, आता लोकशाहीला व संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संविधान वाचवण्यासाठी राज्यभरात आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून पुन्हा एकदा कॉंग्रेसची लढाई सुरू असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे अभय छाजेड यांनी केले आहे.
यावेळी रविंद्र उकरंडे म्हणाले, देशात बेरोजगारी व महागाईचा डोंब उसळला आहे. मात्र यावरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांवर ईडीच्या कारवाया करत आहे.
तर सुनील मलके म्हणाले, कॉंग्रेसला त्यागाचा व बलिदानाचा इतिहास आहे. अनेक संकट आली तरीही कॉंग्रेसने सर्वधर्मसमभावाचा विचार सोडला नाही. तर, कॉंग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवा असे आवाहनही प्रकाश काळे यांनी केले. प्रमोद देवकर म्हणाले, भाजप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करत आहे. अत्यंत चुकीच्या गोष्टी सातत्याने सांगून तरुणांना फसवले जात आहे.
यावेळी रमेश सकट, प्रकाश काळे, अरुण वाघमारे, अमीर शेख, राहुल शिरसाठ, सुनील मलके, राजेंद्र शिरसाठ, सादिक शेख, भुजंग लव्हे, अनिल अहिर, बाबा नायडू, प्रमोद देवकर, करीम शेख, उद्धव गलांडे, संकेत गलांडे, रमाकांत साठे, डॅनियल मगर, ललिता जगताप, तारा शर्मा, संगीता क्षीरसागर, सोपान भोसले, मुन्नाभाई शेख, महेश गलांडे, महेंद्र बाबर, युसुफ मलिक, पुंडलिक गलांडे, अश्विनी उकरंडे उपस्थित होते.