हडपसर, दि. 11 (प्रतिनिधी) -विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तसेच खिचडीचे वाटप करण्यात आले.
डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे ट्रस्टी जयसिंह पाटील यांनी विद्यालयात मेडिकल कॅम्प घेण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी ऍड. प्रभाकर शेवाळे, ऍड. अनिल तांबे, ऍड. मधुसुदन मगर, ऍड. विजय राऊत, पांडुरंग भापकर तसेच विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे, सन्मित्र बॅंकेचे चेअरमन सुनील गायकवाड, सुहास आदमाने, माजी नगरसेविका कविता शिवरकर, माया ससाणे, पुष्पा गायकवाड, प्रा. सुलतान खान, सोपानराव गवळी, पुंडलिक गवळी, सूर्यकांत देडगे, यशवंत झगडे, रमेश काकडे, वैभव डांगमाळी, विजय कोद्रे, महेंद्र तिडके, सचिन गिरमे, ताजने दादा, शंभू जांभूळकर, उदय लोणकर, बापूसाहेब मोरे, दशरथ जाधव, प्राचार्य लहू वाघुले तसेच शिक्षक, पालक उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले यांनी केले. सूत्रसंचालन श्रद्धा ससाणे यांनी व माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी आभार मानले.