स्वेच्छेने जमिनी देणाऱ्यांना 25% जादा रक्कम
असा असेल रिंगरोड प्रकल्प
* 68 कि.मी. लांबी
* 695 हेक्टर भूसंपादन
पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य शासन रिंगरोड प्रकल्प राबवत आहे. यासाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामास गती मिळाली आहे. पश्चिम रिंग रोड हा भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यांतील 37 गावांमधून जाणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर यासाठी भूसंपादन करण्यात येणार असून, प्राथमिक दर निश्चित करण्यात आले आहेत. स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना मूल्यांकनाच्या 25 टक्के जादा रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे रिंगरोड बाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पाचपट मोबदला मिळणार आहे. हा प्रकल्प “एमएसआरडीसी’ने हाती घेतला आहे.
शासनाच्या सूचना
भूसंपादनासाठी जीरायत-बागायती जमिनी, शेतातील झाडे, विहीर आणि घरांचा विचार करून अचूक मूल्यांकन करावे. यात कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
मागील तीन वर्षांतील व्यवहारांचा आधार
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच रिंगरोड बाधितांना पाचपट मोबदला देणार असल्याचे जाहीर केले आहे. जमीन मोबदल्यासाठीचे दर निश्चित करताना त्या गाव अथवा परिसरांत मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांचा आधार घेण्यात आला आहे.
दोन टप्पे
1. पूर्व रिंगरोड : उर्से (ता. मावळ) ते केळवडे (ता.भोर)
जोडले जाणारे तालुके : मावळ, खेड, हवेली, पुरंदर, भोर
2. पश्चिम रिंगरोड : केळवडे ते उर्से टोलनाका
जोडले जाणारे तालुके : भोर, हवेली, मुळशी, मावळ
पश्चिम रिंगरोडने जोडले जाणारे तालुके आणि गावे
पभोर : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे
पहवेली : रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी ब्रुद्रुक, सांगरूण, बहुली.
पमुळशी : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.
पमावळ : पाचणे, चांदखेड, बेंबडओहोळे, परंदवाडी उर्से