बर्मिंगहॅम – उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ब गटातील अखेरच्या व जणू उपांत्यपूर्वी सामन्याचे स्वरूप आलेल्या लढतीत वेल्सवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला व थाटात उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
या सामन्यात भारताने जितके गोल केले तितकेच भक्कम बचावाने वाचवले. हरमनप्रीतने या सामन्यात पहिल्या हाफमध्येच आपला दबदबा सिद्ध केला. त्याने 18 व्या मिनिटाला पहिला गोल केला तर, लगेचच पुढच्याच मिनिटाला आणखी एक गोल करत संघाची आघाडी भक्कम केली.
SEMIS NEXT 🔥🔥#Hockey FULL TIME: Indian Men’s hockey 🏑 team complete their group stage fixtures with 3 wins and 1 draw. We play the semis next against New Zealand
India 4-1 Wales
Let’s go boys!!! pic.twitter.com/PcCVwRZiU9
— SAI Media (@Media_SAI) August 4, 2022
त्यानंतर पहिला हाफ संपण्यापूर्वी 41 व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्ट्रिकही पूर्ण केली. त्याला सुरेख साथ देताना गुरजंतसिंगने 49 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी वाढवली. यानंतर सामना संपण्यापूर्वी वेल्सकडून गॅरेथ फुरलॉंग याने 55 व्या मिनिटाला गोल करत चुणूक दाखवली मात्र, तोपर्यंत त्यांचा पराभव निश्चित झाला होता.
या स्पर्धेत घानाचा 11-0 पराभव केल्यावर भारताला इंग्लंडशी 4-4 असा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र, कॅनडावर 8-0 असा मोठा विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या होत्या व गुरुवारी वेल्सचा पराभव करत थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.