नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर मोठा अनर्थ टळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी दिल्ली विमानतळावर एक कार थेट इंडिगो विमानाच्या चाकाजवळ येऊन थांबली. सुदैवाने विमानाचे चाक आणि कारची धडक झाली नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही कार Go First एअरलाइनची होती. ही घटना विमानतळाच्या टर्मिनल T2 च्या स्टॅण्ड क्रमांक 201 वर झाली. या ठिकाणी Go First एअरलाइन्सची कार इंडिगोच्या A320neo या फ्लाइटच्या चाकाजवळ आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता, DGCA या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
कार चालकाची ब्रेथ एनालायझर चाचणी करण्यात आली आहे. कार चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे समोर आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. त्याशिवाय विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे संगणयत येत आहे.