पौड – पौड-कोळवण रस्त्याचे नुकतेच नवीन काम करण्यात आले; परंतु यादरम्यान असलेले पौड-करमोळी दरम्यान असलेल्या पुलावर आणि वळकी नदीवर असलेल्या चाले पुलावर काम अर्धवट राहिले आहे. सध्या पावसामुळे पुलावर असलेल्या खड्ड्यांवर पाणीच पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डे मोठे होत असून भविष्यात पुलाला भगदाड पडण्याची शक्यता आहे.
पुलावर खड्डे पडल्यामुळे शाळेतील लहान विद्यार्थ्यांना पालकांना दुचाकीवरून सोडताना कसरत करावी लागते तसेच कामगार, दूध व्यावसायिक, महिला यांना दुचाकी आणि चार चाकी चालवताना कसरत करावी लागते. वाहन खड्डे वाचवण्यासाठी वेडीवाकडी चालवत असल्यामुळे पुलाच्या कठड्याला एका वाहनाची जोरदार धडक बसल्याने पुलाच्या कठडा तुटला असून वाहन नदीत पडता पडता वाचले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पुलांवरचे खड्डे तत्काळ बुजवले नाही तर नदीवरून अपघात होऊन वाहने खाली पडण्याची शक्यता आहे. पुलावर पडलेल्या खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
चाले येथील पूल हा कमकुवत झालेला आहे, असा फलक बांधकाम विभाग लावला असून यांदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. पौड-करमोळी दरम्यान पुलावरील खड्ड्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली खड्डे तत्काळ बुजवले नाही, तर आंदोलन करण्यात यईल.
-ज्ञानेश्वर डफळ, तालुकाध्यक्ष, शिव सहकार सेना मुळशी.
पौड-करमोळी दरम्यान पुलावरील खड्ड्यांची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. खड्डे पडून पूल पडण्याची वाट पाहणार आहे का? नागरिकांना अत्यंत जाणे-येणेसाठी अत्यंत हाल होत आहे. लवकर खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील.
-चंदाताई केदारी, जिल्हा उपाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी पुणे.
पुलावरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात लवकरच बुजवले जातील. सध्या डांबर प्लॅंट बंद असल्याने डांबर टाकून बुजवता येणार नाही.
-नकुल रणसिंग, उपअभियंता, मुळशी