मुंबई – गोव्यावरुन मुंबई विमानतळावर आलेले एकनाथ शिंदे हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात महत्वाची चर्चा झाली असून हे दोन्ही नेते एकत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला राजभवनात दाखल झाले आहेत.
राजभवनात पोहचलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हो दोन्ही नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. राज्यपालांना शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून सत्तास्थापनेचा पत्र देण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai: Eknath Shinde met BJP leader Devendra Fadnavis at the latter’s residence, this evening pic.twitter.com/BSiW25H9cU
— ANI (@ANI) June 30, 2022
दरम्यान, याआधी गोव्यावरून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर एकनाथ शिंदे हे केंद्रीय यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले . सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे पोहचल्यानंतर तिथे भाजपाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकातं पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यासह इतर नेते त्याठिकाणी उपस्थित होते.