पुणे : एकनाथ शिंदे मुंबईमध्ये म्हणजे थेट राजभवनात दाखल होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा आजच शपथविधी सोहळा राजभवनात होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आता गोव्यात असून, त्यांची बैठक तेथे पार पडली आहे. त्या सर्वांनी शिंदे यांना निर्णय घेण्यासाठी “पॉवर ऑफ ऍटर्नी’ दिली आहे. त्यानुसार शिंदे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. ही भेट घेण्यासाठी आल्यानंतरच येथे शपथविधीचा कार्यक्रम होणार असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होईल आणि त्यानंतर अन्य खातेवाटप होऊन पुढील प्रक्रिया होणार आहे. दरम्यान शपथविधीनंतर विश्वासदर्शक ठराव सादर सादर केला जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.