पुणे : कपडे विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३ लाखांचे कपडे लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नगर रस्त्यावरील वाघोलीजवळ बकोरी फाटा येथे महिलेचे बी. एम. फॅशन्स कपडे विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील दोन लाख 94 हजार रुपयांचे नवीन कपडे लांबवून चोरटे पसार झाले.