पुणे : रस्त्यावर नागरिकांना अडवून त्यांच्यावर हल्ला करत लुटमार आणि वाहनचोरी करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 4 मोबाइल आणि चोरीच्या 9 दुचाकी जप्त केल्या. तसेच वाहनचोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आल्याची माहिती उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते उपस्थित होते.
दिनेश हरकाबहाद्दूर विका आणि खंडू राजू विठूबोने (दोघे रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहूल पवार, सहायक फौजदार मोहन काळे, अंमलदार हरीष मोरे, प्रताप गायकवाड, राजू धुलागुडे, संजय वणवे, अमोल सरडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.