मुंबई : केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ म्हणजेच केकेचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर KK ला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, KK ने मृत्यूपूर्वी कॉन्सर्टमध्ये जे गाणे गायले, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#WATCH | Singer KK died hours after a concert in Kolkata on May 31st. The auditorium shares visuals of the event held some hours ago. KK was known for songs like ‘Pal’ and ‘Yaaron’. He was brought dead to the CMRI, the hospital told.
Video source: Najrul Manch FB page pic.twitter.com/YiG64Cs9nP
— ANI (@ANI) May 31, 2022
Najrul Manch या फेसबकुवर पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्सर्टचा उत्साही माहौल दिसून आला आहे. मोठ्या संख्येने चाहते ऑडिटोरीअमध्ये उपस्थित होते. प्रत्येकजण आपल्या मोबाईल फोनमध्ये केकेच्या परफॉरमन्सचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. संगीतमय वातावरणात तल्लीन झालेल्या चाहत्यांनी अचानक काय झाले, याची काही कल्पना येऊ शकली नाही.
45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ‘हम रहे या ना रहें कल’, हे गाणं गाताना दिसतो. ‘छोटी सी है जिन्दगी’, असे बोलत गाताना केकेच्या या व्हिडीओची सुरुवात होते. त्यानंतर कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेने फिरतो. मोठ्या संख्येने चाहते गाण्यात मग्न झालेले असतात. केकेसोबतच्या सुरांत सूर मिसळून कॉन्सर्ट ऐकायला आलेल्या चाहत्यांचाही सूर व्हिडीओमध्ये ऐकयाला मिळत आहे.