लखनौ – कंगना रणौत आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खुलेपणाने आपले मत मांडत असते. याच कारणामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. कंगनाला सामाजिक विषयांव्यतिरिक्त राजकारणातही खूप रस आहे. ती उघडपणे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देते. तिने सार्वजनिक व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचेही अनेकदा कौतुक केले आहे.
कंगनाने योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट –
नुकतीच कंगना रणौतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. खुद्द कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. सीएम योगी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जबरदस्त विजय मिळवल्यानंतर, आज मला महाराज योगी आदित्यनाथजींना भेटण्याचे सौभाग्य मिळाले आहे… मला सन्मानित आणि प्रेरित वाटत आहे.. ..’
यूपी निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत बहुमतानंतर पहिल्यांदाच कंगनाने सीएम योगींची भेट घेतली आहे. यापूर्वी तिने यूपीच्या विजयाबद्दल सीएम योगी यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. त्यानंतर कंगनाने सीएम योगी यांचे पोस्टर शेअर करत त्यांचे कौतुक केले. तिने सोशल मीडियावर लिहिले, ‘ना लग्न, ना मुले, ना सत्ताधारी… ज्यांना पाहून गुंड थरथर कापले. ते उत्तर प्रदेशचे योगी आहेत.’ फोटो शेअर करताना कंगनाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या पुनरागमनाबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले आहे.