देशात करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. दिल्लीतील काही शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोठोपाठ उत्तर प्रदेशात सुद्धा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए गौतमबुद्धनगर, गाजियाबाद, हापुड़, मेरठ, बुलंदशहर, बागपत और लखनऊ में सार्वजनिक स्थानों पर फेस मास्क पहनना अनिवार्य किया गया है: उत्तर प्रदेश सरकार
— ANI_HindiNews (@AHindinews) April 18, 2022
करोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. राज्यातील या भागात करोना रुग्णांची संख्या अधिक दिसून येत असल्याकारणाने मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.